ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात झालेला पाकचा पराभव साजरा केला नादखुळ्या कोल्हापूरकरांनी


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : गुरुवारी झालेल्या विश्वचषकातील सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. आणि या पराभवामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अपुरे राहिले आहे. हा सामना संपताच कोल्हापुरातील चौकाचौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Kolhapur residents celebrate Pakistan’s defeat in the match against Australia

ट्वेन्टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्याने, कोल्हापूरमधील क्रिकेटप्रेमींची पार निराशा झाली होती. याचाच वचपा काढण्यासाठी म्हणून काल कोल्हापूरमध्ये दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्यात आली. चौकाचौकामध्ये उत्साही युवकांनी दुचाकीवरुन शहरातून फेऱ्या मारत पाकच्या पराभवाबद्दल जल्लोष व्यक्त केला. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुन्हा एकदा दिवाळी असल्याचा भासच जणू निर्माण झाला होता. या उत्सवातून पाक संघांबाबतचा राग कोल्हापूरकरांनी व्यक्त केला आहे.


कोल्हापूर आरटीओ विभाग प्रायव्हेट बसेस वर करणार कारवाई


मागे जम्मू काश्मीरमधील दोन मेडिकल स्टुडंट्सना पाकिस्तानचा विजय साजरा केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये देखील काही लोकांनी पाकिस्तानचा विजय साजरा केला म्हणून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती.

हार आणि विजय हा खेळाचा भाग असतो. जिंकले तर स्वच्छ मनाने आनंद साजरा करता आला पाहिजे आणि हरल्यानंतर सुद्धा मोठ्या मनाने हार स्वीकारता आली पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॅप्टन विराट कोहली. देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू मोठ्या मनाने खेळताना दिसून येतात.

Kolhapur residents celebrate Pakistan’s defeat in the match against Australia

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात