अमानुष वागणूक मिळणाऱ्या ६९ ऊस कामगारांची सुटका केली कोल्हापूर पोलिसांनी


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. मध्यप्रदेश मधील गुना जिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये काम करण्यास आलेल्या कामगारांना ओलीस ठेवल्याची घटना घडली आहे. त्या कामगारांना ऊसाच्या शेतामध्ये काम करायला लावले, ऊसतोडणी करून घेतली आणि त्या बदल्यात त्यांना फक्त जेवण देण्यात आले. त्यांना विणावेतन काम करण्यास भाग पाडले.

Kolhapur police rescues 69 sugarcane cutting workers

कागलमधील तालुक्यातील नदीकाठी असलेल्या एका गावामध्ये ही घटना घडलेली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 नोव्हेंबर रोजी सहारिया जमातीतील सुमारे 69 महिला, पुरुष आणि मुले कोल्हापूर जिल्ह्यात मजुरीच्या शोधामध्ये आले होते.

त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत विनावेतन त्यांच्याकडून भरपूर काम करून घेण्यात आले होते. आणि विरोध केल्यावर त्यांना गावकऱ्यांनी ओलीस ठेवले. त्यांचे येणे जाणे आणि फिरणे देखील बंद केले होते. अडकलेल्या मजूरांपैकी कोणालाही आपल्या नातेवाईकांसोबत बोलू दिलं जायचं नाही. तेव्हा काही लोकांनी गुप्तपणे गुनामधील आपल्या नातेवाईकांना या सर्व घटनेची माहिती दिली.


Afghanistan Rescue Operation: अफगानिस्तान मध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘देवदूत’ Indian Air Force


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एका स्पेशल पथकाने जिल्ह्यांमध्ये या कामगारांचा शोध घेतला. तपासादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नदीकाठच्या गावांत त्यांना हे कामगार आढळून आले. पोलिस पथकाने गावात जाऊन तपासणी केली. त्यांनी एकूण 69 व्यक्तींची येथून सुटका केलेली आहे. महिला पुरुष लहान मुले असा सर्वांचा या समावेश आहे. पोलिसांनी मजुरांची सुटका करून त्यांना सुखरूप परत गुना येथे पाठवले आहे.

Kolhapur police rescues 69 sugarcane cutting workers

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था