‘’शून्य कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी असलेल्या देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलणे म्हणजे…’’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला निशाणा!
विशेष प्रतिनिधी
नागपूर : ‘’शून्य कर्तुत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. असंस्कृत भाषा वापरून राजकीय आत्महत्या करण्याकरिता उद्धव ठाकरे निघाले आहेत. जर या पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलं, महाराष्ट्र भाजपा त्यांना आडवी पाडेन, सोडणार नाही. जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे आता भाजपा रस्त्यावर उतरेल, यानंतर ते देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलले तर. हे मी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतोय. आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा.’’ अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, त्यांना इशारा दिला आहे. Keep your mouth shut while criticizing Fadnavis today is your last chance if you speak after this BJP’s ultimatum to Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असं म्हटल्याने, आता राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे दिसत आहे. भाजपाने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.
‘’चाणक्य जे म्हणाले तेच आता खरं होतंय’’ उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडवणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’!
या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे म्हणाले, ‘’देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरे! अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते १०० कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही.
‘’आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस” आहेत!’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार
याशिवाय, ‘’उद्धव ठाकरेंसारखा घरकोंबडा, मी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना आज घरकोंबडा म्हणतोय. ज्यांचा कधीही कुठल्या गावातील, समाजाच्या शेवट्या व्यक्तीची समस्या काय आहे, याचा अभ्यास नाही. उद्धव ठाकरेंना कधी रेशन कार्ड काढताना बघितलं नाही. कधी संजय गांधी योजनेचं एक काम करताना त्यांना बघितलं नाही. केवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा एवढीच त्यांची ओळख. सोन्याच्या चमचात बदमाचा ज्यूस पिऊन, अलिशन जीवन जगून मोठा झालेला एक मुलगा. काय महाराष्ट्राची जाण, काय महाराष्ट्राची माहिती?’’ असंही बावनकुळेंनी यावेळी म्हटलं.
शून्य कर्तुत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी असलेले नेते @Dev_Fadnavis यांच्या बद्दल बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे pic.twitter.com/E1OaXmoN7n — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 4, 2023
शून्य कर्तुत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी असलेले नेते @Dev_Fadnavis यांच्या बद्दल बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे pic.twitter.com/E1OaXmoN7n
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 4, 2023
याचबरोबर ‘’मोदींचे फोटो लावून निवडून आल्यावर, काँग्रेस-राष्ट्रवादीची लाळ पुसून मुख्यमंत्रीपद मिळवले.एवढंच त्याचं कर्तृत्व. अशा शून्य कर्तृत्वाच्या व्यक्तीने, अशा शून्य कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी असलेला नेता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलणे म्हणजे खरंतर सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे.’’ असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App