जितेंद्र आव्हाड यांची मंदिरामध्ये पूजा;सरकारी नियम तोडल्याने कारवाईची मागणी

विशेष प्रतिनिधी

नाशिक : सरकारी नियमांचे उल्लंघन करणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करा किंवा सोमवारपासून मंदिर उघडी करा, अशी मागणी धार्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केली. Jitendra Awhad Worshiped in the temple

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाविकांसाठी मंदिरे बंद असताना मंदिरात पूजा करून सरकारचा नियम मोडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भोसले यांनी केली.राज्यातील जनतेला वेगळा आणि मंत्र्यांना वेगळा न्याय आहे, अशी भूमिका ठाकरे सरकार घेत आहे. हे जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीमुळे स्पष्ट झाले आहे.धार्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पुढे सांगितले की,गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली मंदिरे आता भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला पाहिजे.

  • गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मंदिरामध्ये पूजा
  • आव्हाड यांनी सरकारी नियम मोडला
  • मंत्रीपदाचा गैरवापर करून मंदिरात पूजा
  •  जनतेला आणि मंत्र्यांना वेगळा न्याय कसा ?
  •  दीड वर्षापासून भाविकांना मंदिरे बंद
  • आता भाविकांनाही मंदिरे खुली करण्याची मागणी

Jitendra Awhad Worshiped in the temple