प्रतिनिधी
मुंबई : हर हर महादेव सिनेमाच्या प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेमागृहात हर हर महादेव सिनेमावरुन वाद झाला होता. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे. Jitendra Awad arrested for beating audience of Har Har Mahadev movie
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी अनेक ट्विट केली आहेत.
आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनंगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला या असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला मिघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं त्यानंतर डिसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळयात आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होती. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की मी काही करू शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. तसंच सरकारनं कट शिजवून मला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी मी जामीन मागणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा निषेध केला आहे.
नेमके प्रकरण काय?
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये रात्री दहा वाजता हर हर महादेव या मराठी सिनेमाचा शो सुरु असताना जितेंद्र आव्हाड हे काही कार्यकर्त्यांसह सिनेमागृहात शिरले आणि त्यांनी सिनेमाचा शो बंद पाडला. या वेळी काही प्रेक्षकांनी विरोध केला असताना कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण केली. यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी बंद पडलेला शो पुन्हा सुरू करत आव्हाडांवर जोरदार टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App