झारखंडच्या मजुरास खून प्रकरणी अटक; कराड पोलिसांचा पंधरा दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा


विशेष प्रतिनिधी

सातारा : झारखंड येथील बांधकाम मजुराच्या खूनप्रकरणी कराड पोलिसांनी एकास झारखंड येथून अटक केली आहे कराड पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांमध्ये या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. Jharkhand laborer arrested in murder case; Karad police crack down on crime in fortnight

जुगारात पैसे जिंकले, या रागातून झारखंडच्या बांधकाम मजुराचा त्याच्या सहकारी साथीदाराने १३ जुलै रोजी कराड येथील गोळेश्वर परिसरातील शेतात खून केला होता. कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात कराड पोलिसांना यश आला आहे.

कोणतीही तक्रार दाखल नसताना कराड पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्याने पोलिस अधीक्षक अजय कुमार यांनी कराड पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

  • जुगारात पैसे जिंकले, या रागातून झाला होता खून
  • खूनप्रकरणी एकास झारखंड येथून अटक केली
  • अवघ्या पंधरा दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा लावला
  • कोणतीही तक्रार दाखल नसताना कारवाई केली
  • पोलिस अधीक्षक अजय कुमार यांनी कराड पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Jharkhand laborer arrested in murder case; Karad police crack down on crime in fortnight

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण