विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांनीच राहावे. त्यांची अनुक्रमे राष्ट्रवादीच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणासाठी गरज आहे, असा चार ओळींचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारांनीच नेमलेल्या समितीने करून सिल्वर ओक वर त्यांना नेऊन दिला. त्यानंतर समितीच्या सदस्यांशी पवारांनी चर्चा केली आणि या समितीकडे निर्णय घेण्यासाठी काही वेळ मागितला. पवार आता या वेळेत विचार करून समितीला आपला निर्णय कळवणार आहेत.
दरम्यानच्या काळात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या केवळ महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केली नसून ती राष्ट्रीय पातळीवर बहुतेक सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. यामध्ये राहुल गांधींपासून अरविंद केजरीवालांपर्यंत सर्व नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे पवारांना अपेक्षित असलेली राजकीय घटना स्वतःच्या निवृत्ती नाट्यातून त्यांनी घडवून आणली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत शरद पवारांचं मोठं विधान! कार्यकर्त्यांना म्हणाले ‘’दोन दिवसानंतर तुम्हाला…’’
पण तरी देखील अजून एक गोष्ट मात्र घडलेली दिसत नाही. अथवा घडताना दिसत नाही, ती म्हणजे पवारांना त्यांच्या “शिष्योत्तमाचा” अजून फोन आलेला नाही. तसेही पवारांचे “शिष्योत्तम” “प्रत्यक्ष काम” करून दाखवतात. ते कधीच काही बोलत नाहीत. कुठलेही तथाकथित राजकीय नाट्यही घडवून मराठी, हिंदी अथवा इंग्रजी माध्यमांच्या बातम्यांचा टीआरपी वाढवत बसायच्या फंदात पडत नाहीत.
अर्थातच बाकीच्या कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल यांना फोन केले असले, हे “शिष्योत्तम” प्रफुल्ल पटेल सुप्रिया सुळे यांना फोन करण्याची सुताराम शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी जर फोन करतील, ते कदाचित पवारांनाच करतील, असे पवारांना वाटत असावे!! त्यामुळे पवार आपल्या “शिषोत्तमा”च्या फोनची वाट बघत आहेत का??, असा सवाल तयार झाला आहे.
“शिष्योत्तमांचे” दोन नंबर यांनी देखील पवारांना अद्याप फोन केलेला नाही. मग भले या “शिषोत्तमांच्या” नंबर दोनने गुजरात मध्ये अदानींच्या कुठल्याशा फार्म हाऊस वर पवार आणि पटेल प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही महिन्यांपूर्वी चर्चा केलीही असेल, पण त्या दोन नंबरने देखील पवारांना अद्याप फोन केल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत.
मग पवार अशा फोनची वाट बघून निर्णय घेणार आहेत का?? की मध्यंतरी गौतम अदानी अचानक सिल्वर ओक मध्ये जाऊन पवारांना भेटले होते. तेथे त्यांनी पवारांशी दोन तास चर्चा केली होती, त्या दोन तासांमधल्या चर्चेच्या आधारावर पवारांनी आपले निवृत्ती नाट्य घडविले आहे आणि त्या चर्चेतील निरोप – निष्कर्षानुसार पवार पुढचा निर्णय घेणार आहेत??, असाही सवाल तयार होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App