गुंतवणुकीच्या अमिषाने ११ काेटींची फसवणुक


झेन मनी प्लॅन्ट नावाचे कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास गुंतवणुक केलेल्या रकमेवर वार्षीक ३६ टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून ११ काेटी २६ लाख ३७ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


विशेष प्रतिनिधी 

पुणे -झेन मनी प्लॅन्ट नावाचे कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास गुंतवणुक केलेल्या रकमेवर वार्षीक ३६ टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून ११ काेटी २६ लाख ३७ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काेरेगाव पार्क पाेलीस ठाण्यात झेन मनी प्लॅन्ट कंपनीचे नटराजन बालसुब्रमण्यम, शेराॅन नदान, मुकेश गाबा, पुनम भालेराव, हिरेन वासानी, नाझिया तांबाेळी या आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Investment Comany cheated 21persons for 11cr 26 lakhs rupees

याबाबत सुरेशकुमार अप्पलराजु वर्मा (वय-४३,रा.पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे. काेरेगाव पार्क येथे झेन मनी प्लॅन्ट कंपनीचे कार्यालय आहे. सदर कंपनीचे संचालक नटराजन बालसुब्रहमण्यम व शेराॅन नदान यांनी २/७/२०२० ते १२/१०/२०२१ यादरम्यान तक्रारदार सुरेशकुमार वर्म आणि त्यांच्या ओळखीच्या लाेकांना कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे अमिष दाखवले.

कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास गुंतवणुक केलेल्या रकमेवर वार्षिक ३६ टक्के व मासिक अनुक्रमे२,३,४,५ टक्के असा परतावे देवून मुद्दल व त्यावरील परताव्याची रक्कम १८ महिन्यात परत देवू असे अमिष दाखवले. त्या रकमेपाेटी तक्रारदार व त्यांचे परिचयातील इतर गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केलेल्या रकमेबाबतचे नाेटराईज्ड प्रतिज्ञापत्र, इन्वहेस्टमेंट रिसीप्ट, अकाऊंट ओपनिंग फाॅर्म, सिक्युरीटी चेक अशी हमीपत्रे देवून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना काेणातही परतावा अथवा मुद्दल न देता तसेच इतर गुंतवणुकदारांची अशी एकूण ११ काेटी २६ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा वापर हा आराेपींनी त्यांचे व्यैक्तिक कामाकरिता केला आहे.

Investment Comany cheated 21persons for 11cr 26 lakhs rupees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात