आशा कर्मचाऱ्यांची तीव्र निदर्शने !, सहा महिने वेतनाचा पत्ता नाही; कोविड साथीत मोलाची मदत


विशेष प्रतिनिधी

संगमनेर (अहमदनगर) : कोविड महामारीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आशा कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या सहा महिन्यापासून थकविण्यात आले आहे. आशा कर्मचाऱ्यांवरील या अन्यायाच्या विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रभर सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक दिली होती. Intense protests by Asha employees !, no salary for six months ; Valuable help in covid pendamik

सिटूच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सिटू कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचारी संपावर गेल्या. अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये सिटू प्रणित आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने आशा कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. अकोले पंचायत समिती येथे शेकडो आशा कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली.



अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने आशा कर्मचारी एकत्र आल्या. थकित मानधन तातडीने जमा करा, वाढीव मानधन आशा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, वाढीव कामाचा बोजा देणे बंद करा या मागण्यांच्या घोषणा देत आशा कर्मचाऱ्यांनी अकोले शहराचा परिसर दणाणून सोडला.

Intense protests by Asha employees !, no salary for six months ; Valuable help in covid pendamik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात