कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळ झालं तरी लोक घेतात ना? 150 रुपयांची क्वार्टर तुम्ही पिऊ शकता मग आमच्या गायीचं दूध 100 रुपयांने का पिऊ शकत नाही का? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला. Inflation of what, drink quarter of one and a half hundred rupees
विशेष प्रतिनिधी
जळगाव : कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळ झालं तरी लोक घेतात ना? 150 रुपयांची क्वार्टर तुम्ही पिऊ शकता मग आमच्या गायीचं दूध 100 रुपयांने का पिऊ शकत नाही का? असा सवाल रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला.
चाळीसगावात शेतकऱ्यांच्या समस्या,अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नते सदाभाऊ खोत यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. सदाभाऊ म्हणाले की, ‘कोण धाडस करेल, कुठला पक्ष महागाईच्या समर्थनाचे धाडस करेल पण मी धाडस केलं. कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळ झालं तरी लोक घेतात ना? तेव्हा महागाई दिसत नाही, देशी क्वार्टर आता 150 ते 200 रुपयांना मिळायला लागली आहे. मग महागाई नाही वाढली का? महागाई झाली तरी लोकं दारू पिणं सोडता का? कांदा डाळींच्या किंमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल. या महागाईचा शेतकºयांना फायदा होईल.
देशाला पुरेल इतकं तेल देण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. सोयाबिनचा भाव आणि तेलाचा भाव जो वाढला आहे, त्यामुळे शेतकºयांच्या खिश्यात पैसा येईल, मजुरांची मजुरी वाढेल, गरिबाला तेल खायला परवडत नाही, त्यांचीही मजुरी वाढून जाईल. महागाईच्या नावाखाली शेतकऱ्यांचे वाटोळे होत आले आहे. गव्हाचं पीठ महागलं की जीवनावश्यक वस्तू झाली, ज्यांना ज्यांना जीवनावश्यक वस्तू म्हणून फुकट खायचं असेल तर त्यांनी दोन दोन एकर शेती घ्यावी, पण आम्ही फुकटं देणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App