भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पुणे पोलिसांत तक्रार दाखल

mahadeo jadhav new

कोथरूडकडून कर्वेनगर परिसरातून जातांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, मात्र…

प्रतिनिधी

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव (वय-८५) हे आज सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Indian Cricket Player Kedar Jadhavs father Mahadev Jadhav has gone missing

केदार जाधवचे कुटुंबीय पुण्यातील कोधरूड परिसरात राहतात. महादेव जाधव हे आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुरमारास ते घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर अद्याप दिवसभर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा फोनही बंद येत असल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, त्यामुळे त्यांना कोणीही पाहिल्यास त्वरीत संपर्क साधण्याचे आव्हान जाधव कुटुंबियांकडून करण्यात आले आहे. त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. त्यामुळे जाधव कुटुंबिय हे त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ” कोथरूड भागातील अनेक CCTV फूटेज तपासणी केली आहे. यात कोथरूडकडून कर्वेनगर परिसरातून जातांना महादेव जाधव हे दिसत आहेत. मात्र त्याच्या पुढे ते कुठे  गेले हे समजू शकले नाही, त्यांचा शोध सुरू आहे.”

Indian Cricket Player Kedar Jadhav father Mahadev Jadhav has gone missing

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात