भारतीय लष्कराची गौरवशाली परंपरा ! दक्षिण मुख्यालयाने साजरा केला १२८ वा स्थापना दिवस


जुनागड, हेद्राबाद संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनिकरण, गोवा मुक्ती संग्राम, १९७१ च्या युद्धासह अनेक मोहिमात लष्कराच्या दक्षिण मुख्याल्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे. पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे लष्कराने शहिदांना शुक्रवारी मानवंदना दिली.


विशेष प्रतिनिधी

पुणे –भारतीय लष्कराचा सर्वात शक्तिशाली लष्कर म्हणून जगात चवथा क्रमांक लागतो. दैदिप्यमान इतिहास असलेल्या भारतीय लष्कराचा भार सात प्रमुख मुख्यालयांवर आहे. अशाच भारताच्या संपूर्ण दक्षिण भागाची जबाबदारी असलेल्या लष्कराचे दक्षिण मुख्यालयाने आज १२८ वर्षात पदापर्ण केले. या काळात जुनागड, हेद्राबाद संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनिकरण,Indian army southern command completed १२८ years

गोवा मुक्ती संग्राम, १९७१ च्या युद्धासह अनेक मोहिमात बजावली महत्वाची कामगिरी मुख्यालयाने पार पाडत भारतीय सीमा या सुरक्षित ठेवत देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवत राष्ट्रउभारणीतही महत्वाची भूमिका बजावली. या गौरवशाली परंपरतेत अनेकांनी प्राणांची आहूती दिली. अशा शहिदांना दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी पुष्पहार अर्पण करत मानवंदना देत मुख्यालयाचा स्थापना दिवस साजरा केला.दक्षिण कंमाडची स्थापना ही १ एप्रिल १८९५ रोजी झाली. स्थापन झाल्यापासून, आपल्या सैनिकांच्या शौर्य, धैर्य आणि दृढ निश्चयाद्वारे आपल्या राष्ट्राची प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी मुख्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे. देशाच्या रक्षणासाठी दक्षिण कमांडने अनेक लष्करी कारवायांत भाग घेतला आहे. १९४७-४८ मध्ये जुनागढ आणि हैदराबाद या पूर्वीच्या संस्थानांना भारतीय संघराज्यात जोडण्यात दक्षिण मुख्यालयाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा, दमण आणि दीवची मुक्तता १९६१ मध्ये या कमांडच्या नेतृत्व खाली झाली.

१९६५ च्या युद्धादरम्यान, कमांडने कच्छच्या रणमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान लढलेल्या लौंगेवालाच्या लढाईत दक्षिण कमांडच्या शूर सैन्याने पाकिस्तानच्या आक्रमणाविरूद्ध भारतीय भूभागाचे रक्षण केले. प्रत्युत्तराच्या कारवाईत, कमांडच्या फॉर्मेशन आणि युनिट्सने खोखरापार आणि गद्रा मधील महत्वाच्या शत्रू क्षेत्रांवर विजय मिळविला. या कारवाईतील अतुलनीय यशासाठी, दक्षिण कमांडच्या जवानांना ७० शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

श्रीलंकेत ‘आॅपरेशन पवन’चे नेतृत्व करण्यासोबतच, कमांडने ‘आॅपरेशन विजय’ तसेच ‘आॅपरेशन पराक्रम’ मध्येही आपले शौर्य दाखवले. विविध लष्करी कारवायांमध्ये आपले कौशल्य सतत सिद्ध करत असताना, दक्षिण कमांडने अकरा राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारलेल्या जबाबदारीच्या विशाल क्षेत्रात, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमेद्वारे देखील मोठे योगदान दिले आहे.

स्थापना दिनानिमित्त, कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या दक्षिण कमांडच्या शूर सुपुत्रांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यातील दक्षिण कमांड युद्धस्मारक येथे मानवंदना समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी माजी सैनिक आणि कुटुंबियांचा सन्मान केला.

या सोबतच प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचाही त्यांनी सत्कार केला. कोविड महामारीचा सामना करण्यासाठी सर्व आरोग्य सेवा कर्मचा-यांनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. त्यांनी सर्व अधिकारी आणि जवानांना राष्ट्रसेवेत झोकून देत, संवैधानिक भूमिका व्यावसायिक पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले.

भारतीय लष्कराचे शक्तिशाली लढाऊ दलदक्षिण कमांड, गेल्या काही वर्षांत, एक शक्तिशाली लढाऊ दल म्हणून उदयास आले आहे. प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करून, कमांडने अलीकडेच वाळवंटात ३० हजाराहून अधिक सैनिकांचा समावेश असलेल्या ‘दक्षिण शक्ती’चा युद्ध सराव केला.

गेल्या वर्षभरात, दक्षिण कमांडने परदेशी मित्र देशांसोबत अनेक संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावही केले. सतत आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करून, कमांडने स्वदेशी उद्योगातून मिळवलेल्या नवीनतम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत.फोटो : पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे शहिदांना पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देतांना दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन.

Indian army southern command completed १२८ years

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण