दरम्यान डॉक्टरांनी या बाळावर उपचार केले असून त्याची प्रकृती आता चांगली असून सविता खनवटे यांनी हे बाळ अनाथआश्रमात न देता आपल्याला सांभाळण्यासाठी द्यावं अशी मागणी केली आहे. Indapur: Incidents that tarnish humanity, parents leave 8-day-old infant on cold road
विशेष प्रतिनिधी
इंदापूर : इंदापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.घटना अशी घडली की ,आई-वडील स्वतःच्या ८ दिवसांच्या नवजात बालकाला कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर सोडून देत पसार झाले आहेत. हे नवजात अर्भक पुणे-सोलापूर महामार्गाजवळ बाभुळगाव पाटी येथे सापडलं आहे.हे बाळ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका दाम्पत्याला बेवारस पद्धतीने ठेवल्याचं लक्षात आलं.
होत्या.बाभुळगाव पाटी रस्त्यावरुन सकाळी सविता खनवटे या आपल्या पती सोमनाथ यांच्यासोबत कामावर जात असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला.पुढे त्यांनी पाहिलं की कपड्यात एका लहान मुलाला गुंडाळून ठेवलं आहे.दरम्यान कडाकाच्या थंडीमुळे या बाळाचं पूर्ण शरीर गारठून गेलं होतं. यानंतर सविता यांनी शेजारीच शेकोटी पेटवून बाळाला उब दिली. पुढे सोमनाथ यांनी इंदापूर येथे डॉक्टरांना याबद्दलची माहिती दिली.त्यानंतर या बालकाला तात्काळ उपजिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान डॉक्टरांनी या बाळावर उपचार केले असून त्याची प्रकृती आता चांगली असून सविता खनवटे यांनी हे बाळ अनाथआश्रमात न देता आपल्याला सांभाळण्यासाठी द्यावं अशी मागणी केली आहे.यावेळी सविता खनवटे म्हणाल्या की , “मी या बाळाला आईसारखं प्रेम करेन.” दरम्यान कोणतही नातं नसताना या नवजात बालकाला जीवदान देणाऱ्या खनवटे दाम्पत्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App