विशेष प्रतिनिधी
रायगड : २०१४ पासून अपेक्षित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उदघाटन रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे नुकतेच पार पडले आहे. शुक्रवारी हा उदघाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. पत्रकारांसोबत बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, या केंद्राकरिता पंधरा दिवसांमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. तसेच येत्या सहा महिन्यांत हा विभाग स्वतंत्र वास्तूत सुरू होईल असा संकल्पही आम्ही केलाय. या उदघाटन प्रसंगी सहसंचालक महेश शिवणकर, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. उमेश कहाळेकर यांच्यासह अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य देखील उपस्थित होते. inauguration of the first divisional center in the state by Minister Uday Samant in Raigad
दोन महिन्यांत पुणे, मुंबई आणि नागपूर येथेही विभागीय केंद्र सुरू करण्यात येईल. तसेच सहा महिन्यांत कोल्हापूर, रत्नागिरी आणि अमरावती येथीही उपकेंद्र सुरू होतील. या विभागात चार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ते उद्यापासून काम सुरू करतील. हे विभागीय केंद्र साडेसात हजार विद्यार्थ्यांबरोबरच इतर महाविद्यालयांना साठीही एक उपयुक्त केंद्र होईल.
तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होण्याचे आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयांना करण्यात आले आहे. त्याचबरोबर जुन्या शासन निर्णयात बदल करण्याचे संकेतही सावंत यांनी दिले. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी काही नवीन प्रास्ताविक मांडले, तर डॉक्टर अभय वाघ यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाने या विभागास कायमस्वरूपी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तत्परता दाखवावी, असे मत व्यक्त केले. कुलसचिव डॉ. भगवान जोगी यांनी आभार प्रदर्शन केले.
यानंतरच्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संतपीठात पाच अभ्यासक्रम चालू करण्याचे आश्वासन दिले. विद्यापीठाने केलेला खर्च परत देण्याबरोबरच इथून पुढील सर्व खर्च शासन करेल असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मनुष्यबळ विकासासाठी सहा कोटी रुपये मान्यता लवकरच मिळेल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. संत परंपरेचा अभ्यास विद्यापीठातील विदेशी विद्यार्थ्यांना ही करता येईल. अनेक महाविद्यालयांमध्ये वसतीगृहात कोरोना सेंटर्स चालू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालये ठराविक क्षमतेने सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार करण्यात येईल असेही सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App