पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी चाेरटयांनी व्यवसायाकरिता गाळा भाडयाने घेतला. सराफ दुकान बंद असल्याचे हेरुन चाेरटयांनी दाेन्ही दुकानाच्या मधील समाईक भिंतीला भगदाड पाडून त्यातून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करुन सव्वा काेटी रुपयांचा माैल्यवान ऐवज लंपास केला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका ज्वेलर्स दुकानाच्या शेजारी चाेरटयांनी व्यवसायाकरिता गाळा भाडयाने घेतला. सराफ दुकान बंद असल्याचे हेरुन चाेरटयांनी दाेन्ही दुकानाच्या मधील समाईक भिंतीला भगदाड पाडून त्यातून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करुन सव्वा काेटी रुपयांचा माैल्यवान ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. In Warje Malwadi area Mauli jweelars robbery of one cr 26 lakhs rupees
याप्रकरणी वारजे माळवाडी पाेलीस ठाण्यात ज्वेलर्स दुकानाचे मालक आनंदकुमार चुनीलाल वर्मा (वय-३४,रा.कर्वेनगर,पुणे) यांनी अज्ञात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. चाेरटयांनी सदर दुकानातून एक काेटी २३ लाख ७५ हजार रुपयांचे साेने-चांदीचे दागिने चाेरी करुन नेले आहे. वारजे परिसरात एनडीए रस्त्यावरील गणपती माथा भागात शमीम पॅलेस याठिकाणी माऊली ज्वेलर्स हे साेन्याचे दागिन्यांचे दुकान आहे.
शुक्रवारी दुपारी अडीच ते पावणेपाच वाजण्याचे दरम्यान दुकानाचे मालक दुकान बंद करुन बाहेर गेले हाेते. त्यावेळी दुकाना शेजारील मसाल्याच्या व्यवसायासाठी भाडयाने घेतलेल्या दुकानात फर्निचरचे काम सुरु हाेते.शेजारी नवीन दुकानाचे काम सुरु असल्याने चाेरटयांचा संशय न आल्याने दुकानात दागिने मांडलेल्या अवस्थेतच ठेवून ज्वेलर्सचे मालक दुकान बंद करुन बाहेर गेले हाेते.या संधीचा गैरफायदा घेत चाेरटयांनी दुकानाचे शटर बंद करुन दाेन दुकानातील समाईक भिंतीला भगदाड पाडून त्यातून ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. दुकानातील सर्व साेने-चांदीचे दागिने त्यांनी पिशवीत भरुन ते पसार झाले.
ज्वेलर्सचे मालक संध्याकाळी दुकान उघडण्यासाठी परत आले त्यावेळी त्यांना दुकानाचे शटर उघडल्यानंतर दुकानात चाेरी झाल्याचे निर्देशनास आले व धक्का बसला. त्यांनी याबाबतची माहिती वारजे माळवाडी पाेलीसांना देताच वरिष्ठ पाेलीस निरीक्षक शंकर खटके यांच्यासह पाेलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पाेलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आराेपींचा तपास सुरु केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App