विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरूवारी एक ट्विट करून ठाकरे सरकारमधील आणि महाविकास आघाडीतील एकूण १२ जणांची यादी शेअर करून आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. सोमय्यांनी आणखी एक ट्विट करून यात ठाकरे – पवार सरकारमधील “डर्टी डझन”च्या यादीत आणखी दोन नाव त्यांनी समाविष्ट केली आहेत. In Somaiya’s “Dirty List”, Mayor Kishori Pednekar, MLA Yamini Jadhav Adv; Raut said, they will also raid the soldiers of the Municipal Corporation!!
मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर इन्कम टॅक्स छापे पडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे हे म्हणजे केंद्र सरकार महापालिकेच्या शिपायांवर देखील छापे घालतील, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये ठाकरे सरकारमधील आणि महाविकास आघाडीतील एकूण १२ जणांची यादी उघड केली आहे. त्यामध्ये मंत्री अनिल परब, शिवसेना नेते संजय राऊत, सुजीत पाटकर, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, मंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र वायकर, मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक अशी नावे या यादीत आहेत. यासोबत त्यांनी या डर्टी डझनमध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव कुटुंब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांची दोन घेतली असून या दोन नावांचा विसर पडला असे म्हणून ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, “ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे”. त्यामुळे किरीट सोमय्या आज कोणता नवा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
किरीट सोमय्या म्हणाले होते, “ महा विकास आघाडीचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परब आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झालीय. बेनामी रिसॉर्टमध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालीय”.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App