विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये अजानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटे भजन, पूजा करण्यावर असलेली बंदी आता हटवण्यात आली आहे. नाशिकचे नूतन पोलिस आयुक्त जयंत नायकनवरे यांनी ही माहिती दिली आहे.In Nashik, the ban on bhajans was lifted for 15 minutes before and after Ajaan
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. लाऊडस्पीकरच्या वापरासाठी नवीन ऑर्डरची आवश्यकता नाही. त्यामुळे नाशिकचे माजी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी जारी केलेल्या आदेशाची आता आवश्यकता नसून तो रद्दबातल ठरवण्यात आला आहे.
नाशिकचे माजी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी १८ एप्रिल रोजी आदेश जारी करून हनुमान चालीसा किंवा भजन वाजवण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असा आदेश दिला होता. अज़ानच्या आधी आणि नंतर १५ मिनिटांच्या आत परवानगी दिली जाणार नाही. मशिदीच्या १०० मीटरच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.
कायदा व सुव्यवस्था राखणे हा या आदेशाचा उद्देश आहे, असे म्हटले होते. वाद वाढल्यानंतर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना हटवण्यात आले.२० एप्रिल रोजी नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना भजन बंदीच्या आदेशानंतर पदावरून हटवण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App