Corona Update : राज्यात कोरोना कमी होत चाललाय ; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के

वृत्तसंस्था

 मुंबई : राज्यात कोरोना कमी होत चालला असल्याचे रुग्ण आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मंगळवारी 52,898 रुग्ण बरे तर  28,438 नवीन रुग्णांचे निदान झाले. आजपर्यंत एकूण 49, 27, 48 जण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.69% झाले आहे.In maharashtra Recovery Rate of Coronavirus patients is 90 %

राज्यात मंगळवारी 679 जणांचा मृत्यू झाला. सध्या मृत्यूदर 1.54% आहे.आजपर्यंतच्या 3,15, 88, 717 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,33, 506 (17.2 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आहेत.सध्या 30, 97, 161 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,004 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. एकूण 4,19,727 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत रुग्णसंख्येत पुन्हा घट 

मुंबईतमंगळवारी 953 बाधित रुग्णांची नोंद झाली. तर 2258 जणांना डिस्चार्ज दिला आहे. 32 हजार 925 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत सोमवारी 1657 रुग्णांची नोंद झाली आहे.

2572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला . मुंबईचा डबलिंग रेट हा आता 255 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर गेले आहे.

पुण्यातही  रुग्णसंख्येत घट

पुणे शहरात नव्याने 1 हजार 21 रुग्णांची नोंद झाली असून 2 हजार 892 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 36 हजार 690 झाली आहे.

In maharashtra Recovery Rate of Coronavirus patients is 90 %