विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाचे संकट आणखी किती दिवस सुरु राहील, याचा नेम नाही. पण, अनेक चांगले निर्णय घेऊन सामान्य नागरिकांचे जीवन आनंदी करता येणे शक्य आहे. त्यामध्ये पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा समावेश आहे. In Coronavirus Pandemic Prices of 5 Essential Commodities Should be stable. For That Appropriate Steps are Needed
कोरोना काळात किरणा सामानाचे भाव वाढले आहेत. आपल्याला कोरोना संपवायचा असून किराणा देखील जपून वापरायचा आहे. त्याबरोबर किरणा सामानाचे भावही आटोक्यात ठेवायचे आहेत, याचे भान राज्य आणि केंद्र सरकारने ठेवायला हवे. त्यासाठी गहू, तांदूळ, साखर, तेल आणि डाळी या पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कोरोना संपेपर्यंत स्थिर राहतील, अशी घोषणा केंद्र आणि राज्य सरकारांनी केली पाहिजे.
केंद्र आणि विशेषतः राज्य सरकारांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पूर्वी राज्यात युतीच्या राजवटीत पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पाच वर्षे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तसे आश्वासन जनतेला तेव्हा दिले आणि ते पाळले होते. आता तर त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री बनल्यामुळे त्यांनी पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याबत पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 1995 मध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल आणि तूरडाळी यांच्या किंमती पाच वर्षे वाढणार नाहीत याची काळजी घेतली होती.
गहू, साखर, तांदळाची निर्यात रोखा
पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी गहू, तांदूळ, साखर, तेल आणि डाळी यांची निर्यात रोखा. देशात गहू, तांदूळ आणि साखरेचे मुबलक उत्पादन झाले आहे. त्यामुळे त्यांची निर्यात काही काळासाठी थांबवावी. त्यामुळे देशांतर्गत साठा वाढून भाव कमी होतील. कोरोनाविरोधी लस निर्यात करून लसीचा तुटवडा केला. त्याप्रमाणे सगळी साखर निर्यात करून साखरेची टंचाई करू नका म्हणजे झाले. अन्यथा नंतर तुम्हीच सांगाल ‘साखर जास्त खाऊ नका मधुमेह होतो.’
खाद्यतेल अवाक्यावाहेर
डाळीच्या किंमतीवर अंकुश आणण्यासाठी आयती वरील प्रतिबंध हटविले आहेत. हा केंद्र सरकारचा निर्णय सामान्य माणसाच्या दृष्टीने चांगला आहे. पण, पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्याचीही आहे. राज्यात खाद्यतेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्यावर अंकुश आणण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App