चंद्रपूरमध्ये १७ पोलिसांसह इतर विभागाच्या ८ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई , हेल्मेटसक्ती तीन टप्प्यांत होणार

विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांसह खाकी वर्दीत असणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.In Chandrapur, penal action will be taken against 8 employees of other departments, including 17 policemen, for wearing helmets in three phases


विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : दुचाकी वाहनचालकांच्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे. यावेळी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांसह खाकी वर्दीत असणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

500 रुपयांचा दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे.या दरम्यान 17 पोलिसांवर व 8 इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकही अवाक् झाले आहेत.हेल्मेटसक्ती होणार तीन टप्प्यांत

प्रथम पोलीस विभाग, त्यानंतर शासकीय अधिकारी-कर्मचारी, त्यानंतर सर्वसाधारण नागरिकांवर अशी कारवाई करण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा हे पोलीस विनाहेल्मेट आढळून आल्यास दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सोबतच चारचाकी वाहनात सीटबेल्ट आवश्यक करण्यात आल्याची माहिती वाहतून पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील म्हणाले.त्यानुसार गेल्या चोवीस तासात 17 पोलिसांसह इतर विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

In Chandrapur, penal action will be taken against 8 employees of other departments, including 17 policemen, for wearing helmets in three phases

महत्त्वाच्या बातम्या