बीड विठ्ठल मंदिरात, ६३ हजार तुळशीची आरास ; साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले मंदिर

 

बीड : बीडच्या पेठ बीड भागात साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विठ्ठल मंदिरात, ६३ हजार तुळशीची आरास भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही आरास करण्यासाठी खास पुण्याहून ६३ हजार तुळशीचे रोपे मागवण्यात आली आहेत.In Beed Vitthal Temple, Decoration of 63 thousand Tulsi

संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा गोविंद पंत यांच्या कालावधीत या मंदिराची स्थापना झाली असून पुजारी कुटुंबाची मागील चार पिढ्यांपासून याठिकाणी सेवा सुरू आहे. विठ्ठल मंदिरात ही आरास साकारण्यासाठी १२ तासांचा कालावधी लागला आहे.कोरोनामुळे सलग दोन वर्ष वारी चुकल्यानं किमान पुढच्या वर्षी तरी कोरोनाचं संकट टळून आपल्या विठूरायाचं मुख दर्शन व्हावं, अशी प्रार्थना भाविक करत आहेत.

  • संत ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंद पंत काळातील मंदिर
  •  बीड विठ्ठल मंदिरात, ६३ हजार तुळशीची आरास
  • आरास साकारण्यासाठी १२ तासांचा कालावधी
  • आरास साकारणारा तरुण मंगेश कुलकर्णी
  • खास पुण्याहून ६३ हजार तुळशीचे रोपे

In Beed Vitthal Temple, Decoration of 63 thousand Tulsi