औरंगाबादेत झालेल्या भीषण ट्रक अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. वैजापूर तालुक्यातील लासूर रोडवरील शिवराई फाट्याजवळ हा अपघात झाला. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास दोन आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी एका वाहनातील काही जण लग्नाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी औरंगाबादहून नाशिककडे जात होते. स्थानिक लोक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चार जणांवर औरंगाबादमध्ये, तर उर्वरितांवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. In Aurangabad, two trucks collided head-on, killing 4 and injuring 22 on the way to the wedding
प्रतिनिधी
वैजापूर : औरंगाबादेत झालेल्या भीषण ट्रक अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. वैजापूर तालुक्यातील लासूर रोडवरील शिवराई फाट्याजवळ हा अपघात झाला. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास दोन आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी एका वाहनातील काही जण लग्नाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी औरंगाबादहून नाशिककडे जात होते. स्थानिक लोक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चार जणांवर औरंगाबादमध्ये, तर उर्वरितांवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की चार जणांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. ज्या दोन ट्रकची धडक झाली त्यातील एकामधील लोक लग्न समारंभासाठी जात होते. मृत्युमुखी पडलेले सर्व लोक या ट्रकमधील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी वाहनाचा वेग जास्त असल्याने अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दोन्ही ट्रक एकमेकांवर आदळले. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ट्रकमध्ये अनेक जण होते. यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लासूर रोडजवळील शिवराई फाट्यावर झालेल्या या अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळ गाठले. यानंतर नजीकच्या वैजापूर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने तीन जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आणि काही वेळातच चौथ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला. सध्या 22 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App