• Download App
    IIT ENGINEER ARRESTED :विराट कोहलीच्या मुलीला बलात्कार करण्याची धमकी देणाऱा इंजिनिअर मुंबई पोलिसांच्या ताब्यात|IIT ENGINEER ARRESTED: Mumbai police arrest engineer who threatened to rape Virat Kohli's daughter

    IIT ENGINEER ARRESTED :विराट कोहलीच्या मुलीला बलात्कार करण्याची धमकी देणाऱा इंजिनिअर मुंबई पोलिसांच्या ताब्यात

    सोशल मीडियावरून विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराचा धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला बेड्या ठोकल्या.IIT ENGINEER ARRESTED: Mumbai police arrest engineer who threatened to rape Virat Kohli’s daughter


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. पारिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावरून विराट कोहलीच्या मुलीवर बलात्काराचा धमकी देण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रामनागेश अलिबथिनी आहे. तो इंजिनियर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विराटच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा इंजिनियर असल्याचे समोर आले आहे. तसेच तो फूड डिलिव्हरी अॅपसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.



    पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर

    सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी विराट कोहलीला लक्ष्य केले होते. तसेच त्यात एकाने थेट विराट कोहलीच्या अवघ्या दहा महिन्यांच्या लेकीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. ही बाब समोर आल्यावर त्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. तसेच संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानुसार अखेर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपीला बेड्या ठोकल्या.

    IIT ENGINEER ARRESTED: Mumbai police arrest engineer who threatened to rape Virat Kohli’s daughter

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!