प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरातील दुकाने आणि आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर मुंबई महापालिका कायद्याचा बडगा उगाणार आहे. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी मंगळवार ३१ मे २०२२पर्यंत मुदत देण्यात आली होती. या पूर्ततेचा आढावा घेण्यासाठी येत्या ८ ते १० दिवसात सर्वेक्षण केले जाणार असून त्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय तसेच न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.If shop signs in Mumbai are not in Marathi, the law will be broken in 8 days !!; Municipal orders
कायदेशीर कारवाई
मुंबईत मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने आणि बार तसेच इतर दुकाने आणि आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने येत्या ८ ते १० दिवसात मराठी नामफलकाबाबतच्या पूर्ततेची दुकाने आणि आस्थापना खाते सर्वेक्षण करून आढावा घेणार आहे.
त्यानंतर आढाव्याच्या अनुषंगाने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली जाईल. तसेच महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम २०२२ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रमुख अधिकारी (दुकाने व आस्थापना) सुनीता जोशी यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App