महापालिका सभागृहाची मुदत संपल्यानंतर किती भाजपचे नगरसेवक महापालिकेत गेले. असा प्रश्न करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, कार्यकाळ संपला म्हणून महापालिकेत जाणे बंद करू नका असा सल्ला दिला आहे. If carporater tenure completed in PMC they will not stop to going PMC says BJP state president chandrkant patil
विशेष प्रतिनिधी
पुणे -महापालिका सभागृहाची मुदत संपल्यानंतर किती भाजपचे नगरसेवक महापालिकेत गेले. असा प्रश्न करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, कार्यकाळ संपला म्हणून महापालिकेत जाणे बंद करू नका. तुम्ही नगरसेवक नसला तरी माजी नगरसेवक, शहराचे नागरिक आहात याची जाणीव ठेवा. अशा शब्दात आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना तुमची महापालिकेतील उपस्थिती कायम राहली पाहिजे अशी सूचना केली.
भारतीय जनता पार्टी पुणे शहर आयोजित, “पुणे महानगरपालिका कार्यअहवाल प्रकाशन सोहळा” प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, संघटक सरचिटणीस राजेश पांडे धीरज घाटे आदी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आगामी काळात आपण नगरसेवक आहोत, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आदी पदाधिकारी आहात हे विसरू नका. या शहराला महापालिका सोडून भाजप माहित नाही का. आपण केवळ नगरसेवक म्हणून काम करायला आलेलो नाही. महापालिकेत निवडूण आलो, स निधी मिळविणे हे स्पप्न न ठेवता आपण राष्ट्रीय कार्यकर्ते आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे. केवळ निवडणुक आली म्हणून खर्च करायचा असे धोरण नको. संघटना जीवंत असेल सशक्त असेल तरच महापालिका जिंकता येते असेही पाटील म्हणाले. किरिट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यावर शहरात किती ठिकाणी आपण निदर्षने केली. संघटना, विचारासाठी लढाई केली गेली पाहिजे. संघटना असेल तरच तुम्ही नगरसेवक, आमदार, मंत्री होऊ शकता. त्यामुळे संपर्क अभियानाच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांपर्यंत पोहचले पाहिजे असेही ते म्हणाले.
मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा व महापालिकेने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा व लेखा जोखा या अहवालाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे उपस्थितांना केले. गेल्या पाच वर्षात भाजपने केलेले काम व त्यापूर्वी ५० वर्षे त्या सत्ताधारी पक्षांनी केलेले काम याची तुलना व मूल्यांकन नागरिक करतील तेव्हा या पाच वर्षात पुण्याला काय दिशा मिळाली हे समोर येईल असेही ते म्हणाले.यावेळी गणेश बिडकर, राजेश पांडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. दीपक पोटे यांनी सुत्रसंचालन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App