उन्हाळयामुळे बालक्नीचे दार उघडे ठेवून झाेपले अन चाेरटयांनी संधी साधली -हाॅटेल मॅनेजरच्या घरात पाच लाखांचा चाेरटयांचा डल्ला


उन्हाळयामुळे घरात रात्रीचे गरम हाेत असल्याने तसेच वारा लागत नसल्याने घरातील काही मंडळी टेरसेवर झाेपण्यास गेली तर काहीजण घरातच बालक्नीचा दरवाजा उघडा ठेवून झाेपली. मात्र, हीच संधी साधत चाेरटयांनी हाॅटेल मॅनेजरच्या घरात डल्ला मारत तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे साेन्या-चांदीचे दागिनेसह राेख राेकड पळवून नेल्याचा प्रकार कात्रज परिसरातील संताेषनगर येथे घडला आहे.


विशेष प्रतिनिधी 

पुणे – उन्हाळयामुळे घरात रात्रीचे गरम हाेत असल्याने तसेच वारा लागत नसल्याने घरातील काही मंडळी टेरसेवर झाेपण्यास गेली तर काहीजण घरातच बालक्नीचा दरवाजा उघडा ठेवून झाेपली. मात्र, हीच संधी साधत चाेरटयांनी हाॅटेल मॅनेजरच्या घरात डल्ला मारत तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे साेन्या-चांदीचे दागिनेसह राेख राेकड पळवून नेल्याचा प्रकार कात्रज परिसरातील संताेषनगर येथे घडला आहे. House theft in katraj area, unkonown accused theft five laksh jwellery and cash

याप्रकरणी किरण प्रल्हाद कादे (वय-४८) यांनी भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात अज्ञाेत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. किरण कादे हे पुण्यातील एका हाॅटेल मध्ये मॅनेजरचे काम करत असून कात्रज परिसरातील संताेषनगर येथील बालाजी संकुलाजवळ त्यांचे राे-हाऊस आहे. बुधवारी रात्री ते घरातील हाॅल मध्ये बाल्कनीचा दरवाजा उघडा ठेवून व हाॅलच्या दरवाज्याला कडी लावून झाेपले हाेते.तर, एका खाेलीत त्यांची मुलगी झाेपली हाेती दुसऱ्या खाेलीचा दरवाजा उघडाच हाेता आणि घरातील उर्वरीत व्यक्ती टेरसेवर झाेपण्यास गेले हाेते. मध्यरात्री एक ते पहाटे सहा वाजण्याचे दरम्यान अज्ञात इसम बाल्कनीच्या दरवाज्यातून त्यांचे घरात शिरुन त्याने बेडरुम मधील कपाटातील लाॅकर मध्ये ठेवलेले १३ ताेळे वजनाचे चार लाख रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने व एक लाख रुपये राेख असा मुद्देमाल पळवून नेला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पाेलीस पुढील तपास करत आहे.

गावाला गेले आणि चाेरटयांनी घर फाेडले

वडगाव धायरी परीसरातील महादेवनगर येथील नारायण स्मृती बंगला याठिकाणी राहत असलेल्या स्मीता मनीष सावंत (वय-२६) या कामानिमित्त कुटुंबासह एक दिवसाकरिता घराचा दरवाजा लाॅक करुन बाहेर गेल्या हाेत्या. चाेरटयांनी याच दरम्यान त्यांच्या हाॅलचे खिडकीचे दाेन गज कापून त्यावाटे घरात प्रवेश करुन बेडरुम मधील किचन जवळील लाकडी कपाटाचे लाॅकर ताेडून उचकटून त्यातील दाेन लाख १६ हजार रुपये किंमतीचे साेने-चांदीचे दागिने राहते

घरातून चाेरुन नेले आहे. तर, अशाचप्रकारे काेंढवा येथील मन्नत काॅर्नर येथे राहणाऱ्या महंम्मद हसिम मैनुद्दीन शेख (वय-३७) यांचे राहते घराचे दरवाजाचे कुलुप ताेडून काेणीतरी अज्ञात चाेरटयाने घरात प्रवेश करुन ३८ हजार रुपये राेख, दाेन लाख ४४ हजार रुपये किंमतीचे सात ताेळे वजनाचे साेन्याचे दागिने व १५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैंजण असा दाेन लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल घरफाेडी चाेरी करुन नेला आहे.

 House theft in katraj area, unkonown accused theft five laksh jwellery and cash

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”