देशातील कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्राची आहे. आपले घर सुधारता येत नसलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता उत्तर प्रदेशला सल्ले देण्यास सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशातील स्थिी अत्यंत गंभीर आहे त्यामुळे सर्व राजकारण्यांनी कोरोनाविरुध्द लढण्यासाठी हातात हात घालून एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.Home not improved but Sanjay Raut worried about Uttar Pradesh, Uddhav Thackeray waved and said Maharashtra model to fight against Corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्राची आहे. आपले घर सुधारता येत नसलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता उत्तर प्रदेशला सल्ले देण्यास सुरूवात केली आहे.
उत्तर प्रदेशातील स्थिी अत्यंत गंभीर आहे त्यामुळे सर्व राजकारण्यांनी कोरोनाविरुध्द लढण्यासाठी हातात हात घालून एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राऊत यांनी हे उत्तर प्रदेशच्या चिंतेतून नव्हे तर आपल्या कोत्या राजकारणातूनच म्हटले असल्याचेही दिसून आले आहे. काही राज्ये चाचण्याच करत नाहीत. त्यामुळे त्यांचा कोरोना रुग्णांचा आकडा दिसत नाही. परंतु, अंतिमत: हे धोक्याचे ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी यापुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आरतीही ओवाळली आहे. ते म्हणाले की, ‘राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व सूत्रे हातात घेतली.
त्यामुळेच आता मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत, त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. यासोबतच आता दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र मॉडेल’ प्रमाणेच चालावे लागेल.
मुंबईत रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 24 तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरू आहे या सर्वांचा आढावा ते घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच परिस्थितीवर नियंत्रण यावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सूत्रं हातात घेऊन सातत्याने काम करत आहेत. कोणत्याही युद्धामध्ये सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नसतो. ते वॉररुममध्ये बसून यंत्रणा राबवतात आणि विजयाकडे नेतात.
महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी होण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना द्यायला हवे. विरोधकांनी काही काळ टीका करणे बंद करावे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App