प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात चुरशीच्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. अटीतटीची ही लढाई कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मत हे निर्णायक असल्याचे म्हटले जात आहे. Hitendra Thakur raises blood pressure on both sides
त्यामुळे मतदानानंतर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ज्याला मते दिली तोच उमेदवार निवडून येणार, असा विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. पण हितेंद्र ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही बाजूंचे ब्लडप्रेशर वाढले आहे.
आपण कोणाला मत दिले हे कधीही सांगायचे नसत. त्यामुळे मी सुद्धा कोणाला मत दिले ते सांगणार नाही. पण आम्ही ज्याला मते दिलीत तोच उमेदवार निवडून येईल, थोड्याच वेळात तुम्हाला ते कळेल, अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे आता या निकालाची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
विभागाचा विकास महत्वाचा
माझ्या विभागाची कामे ही माझ्यासाठी महत्वाची असतात. हे भल्याभल्या नेत्यांना माहिती आहे, त्यामुळे फार काही बोलायची आवश्यकता नाही. आणि विभागाचा विकास होणारच, असा विश्वासही हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App