WATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला

Heavy Rains in Beed district; Crops damage

बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. वडवणी तालुक्यातील पुसरा नदीला पूर आला आहे. तिगाव आणि चिंचाळा गावाचा संपर्क तुटला आहे. परिणामी दळवणाचा प्रश्न उपस्थित झाला. या गावासह अनेक छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांचा संपर्क देखील पूर्णपणे तुटला असून सध्या पुसरा नदीच्या पुलावरून पाणी वाहते आहे. पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर खरिपाचे पिकं नष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसानं बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी यासह इतर ठिकाणी झोडपून काढले आहे. Heavy Rains in Beed district; Crops damage

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात