विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या अनेक भागांत २५ ते २८ एप्रिलदरम्यान पाऊस पडणार आहे. वादळी-वाऱ्यासोबतच विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.Heavy rainfall in next two days in Maharashtra
२७ आणि २८ एप्रिलला कोकण आणि गोव्यासह उर्वरित मध्य भारतात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सध्या दक्षिण तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
त्यामुळे दक्षिणेकडील बहुतांशी राज्यांत अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यांतही पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात काही दिवसांपासून हवामान बदल होत असल्याचे दिसते.
शुक्रवारी चंद्रपूरला दुपारी भर उन्हात अवकाळी पाऊस बरसला. विदर्भात एकीकडे तापमान वाढत असताना चंद्रपुरात पावसाच्या सरी कोसळल्याने प्रचंड उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली.
राज्यातील तापमान हळूहळू वाढत जाऊन उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली होती. आता पुन्हा वातावरणात बदल झाल्याचे दिसत असून येत्या चार-पाच दिवसांत पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App