शाळा सुरू करण्याबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

आरोग्य विभागाने केलेल्या या सूचनांचा विचार शिक्षण विभाग करणार आहे. त्यानंतर याबाबतीत शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे.Health department issued guidelines for starting schools


विशेष प्रतिनिधी

मुंबई : १ डिसेंबर पासून राज्यभरातील पहिली सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग कडून जिल्हापरिषद महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

या सूचनांचे काटेकोरपणे पालन राज्यातील सर्व शाळांनी करायचा आहे.आरोग्य विभागाने केलेल्या या सूचनांचा विचार शिक्षण विभाग करणार आहे. त्यानंतर याबाबतीत शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे.



या आहेत आरोग्य विभागाच्या सूचना

१) शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो किमान सहा फूट अंतर ठेवावे.
२) प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.
३)शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
४)वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी.
५)ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी.
६)शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितीच्या पद्धतीचा अवलंब करू नये.
७)मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये,आवश्यक नियमांचे पालन करावे.
८)शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.
९)क्वॉरंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी

Health department issued guidelines for starting schools

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात