दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, पण चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले, असे मुश्रीफ म्हणाले.Hasan Mushrif’s reply to Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य कुणाकडे सोपवण्याची ही वेळ आहे, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, पण चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले, असे मुश्रीफ म्हणाले.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार हे शडो मुख्यमंत्री आहेत, अशी टीका केली होती.दरम्यान या टीकेला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले की , शरद पवार यांना अनेक वर्षे मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. एसटी संपावर पवार यांनी तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या पोटात का दुखावे? पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडी एकत्र आहे. ते भाजपला सहन होत नाही. आघाडी सरकार पाच वर्षे आपले काम करणार. कोणीही काही म्हणो आम्ही आमचे काम करीत राहणार आहोत.
पुढे मुश्रीफ म्हणाले की , पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकजण काम करत असतो, त्यामुळे राष्ट्रवादी देखील पक्ष वाढवत आहे. पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादी देशभरात प्रयत्न करत आहे.आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App