वृत्तसंस्था
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनी संपवायचा आहे. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होतो आहे, तरी आम्ही मातोश्रीवर जाणाराच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले. hanuman chalisa at matoshree : Rana slammed chief minister uddhav thackeray
“महाराष्ट्राच्या शांतीसाठी आजचा बजरंगबलीचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनि आजच्या दिवशी संपवायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली, या उद्देशासाठी जर आमचा विरोध होत असेल. मराठी व्यक्तीला हनुमान चालीसा वाचण्यापासून रोखलं जातंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. सत्तेचा दुरुपयोग होतोय.”
https://www.youtube.com/watch?v=PW1nwz1o_bM
“हे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असते, तर आम्हाला हनुमान चालीसा वाचू दिली असती. महाराष्ट्राला लागलेला शनि संपवण्यासाठी आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं. पोलीस आम्हाला थांबवत आहे. शिवसैनिकांना दारासमोर उभं करून आमच्या विरोधात गुंडागर्दी, हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय.”
ते म्हणाले, हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये, असे आवाहन रवी राणा यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App