गुजरात : वडोदरामध्ये केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट , ४ कामगारांचा मृत्यू ; १० जखमी


स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकू आल्यावर त्यांना रेल्वेचा अपघात किंवा भूकंप झाल्यासारखे वाटले.Gujarat: Massive blast at a chemical factory in Vadodara, killing 4 workers; 10 injured


विशेष प्रतिनिधी

गुजरात : गुजरातच्या वडोदराजवळील इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एरियामध्ये असलेल्या कँटन लॅबोरेटरी कंपनीच्या बॉयलरचा शुक्रवारी अचानक स्फोट झाला.या स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली. दरम्यान या स्फोटात चार मजुरांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या आणि घरांना तडेही गेले.स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या लोकांना ऐकू आल्यावर त्यांना रेल्वेचा अपघात किंवा भूकंप झाल्यासारखे वाटले.घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले असून घटनेच्या कारणाचाही शोध घेतला जात आहे.

सुरक्षा साधनांच्या अभावामुळे ही दुर्घटना घडल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सुरक्षेसाठी या कारखान्यात कोणतेही साधन उपलब्ध नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित कुटुंबीयांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Gujarat: Massive blast at a chemical factory in Vadodara, killing 4 workers; 10 injured

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती