श्रद्धा लव्ह जिहाद हत्येनंतर सरकारचे पाऊल; आंतरधर्मीय विवाहांसाठी समन्वय, समूपदेशन समिती

प्रतिनिधी

मुंबई : श्रद्धा वालकर लव्ह जिहाद हत्याकांडानंतर राज्य सरकारने सावध पावले उचलली असून असे प्रकार टाळण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने समन्वय समिती नेमली आहे. Govt steps after Shraddha Love Jihad murder

महिला व बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली ही समिती आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलींची तसेच, त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेऊन यांच्यात समन्वय घडवून आणणार आहे. त्याचप्रमाणे आईवडील किंवा मुली समन्वयासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.


लव्ह जिहाद : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब आणि त्याच्या परिवारालाही कठोर शिक्षा द्या; श्रद्धाच्या वडिलांचा संताप


महिला व बालविकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महिला व बालविकास विभाग प्रधान सचिव, आयुक्त, सहसचिव, नांदेडचे अॅड. योगेश देशपांडे, औरंगाबादचे संजीव जैन, नाशिकच्या सुजाता जोशी, मुंबईतून अॅड. प्रकाश साळसिंगिकर, नागपूरमधून यदू गौडिया, अकोल्यातून मीरातून कडबे, पुण्यातून शुभदा कामत, मुंबईतून योगित साळवी, उपायुक्त महिला व बालविकास आयुक्तालय यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही समिती काय करणार ?

ही समिती नोंदणीकृत विवाह, अनोंदणीकृत विवाह, आंतरधर्मीय विवाह, पळून केलेले आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह यांची इंत्यभूत माहिती ठेवणार आहे. अशा महिला तसेच मुलींच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत किंवा नाही याचीही माहिती घेतली जाणार आहे. अशा मुलींच्या पालकांचा शोध घेऊन त्या पालकांचे समुपदेशन केले जाणार आहे.

Govt steps after Shraddha Love Jihad murder

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात