प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “सिल्वर ओक” निवासस्थानाच्या दिशेने दगड आणि चप्पल फेक केल्यानंतर केल्यानंतर कामगारांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी राहत्या घरातून गांवदेवी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर केले. त्यावेळी सदावर्ते यांना 14 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी ठाकरे – पवार सरकारने केली. परंतु, कोर्टाने फक्त 2 दिवसांची कोठडी मंजूर केली होती.Govt seeks 11-day remand for Gunaratna Sadavarten; Court granted only 2 days remand
आज पुन्हा एकदा सरकारने सदावर्ते यांच्यासाठी 11 दिवसांची पोलिस कोठडी मागितली. परंतु, कोर्टाने फक्त दोन दिवसांची कोठडीची मुदत वाढवून 13 एप्रिल पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली होती. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी, ११ एप्रिल रोजी ही कोठडी संपली. त्यानुसार सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद!
सुनावणीच्या वेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अनेक दावे केले.
शरद पवारांच्या घरावर चाल करून जाण्याचा कट आधीच शिजला होता. हल्ल्याच्या दिवशी सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस न्यायालयात गेले होते.
सदावर्ते यांचा विजयोत्सव बारामतीत साजरा करण्यासाठी मिटींग झाली होती.
घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूर मधून व्हॉटअॅप कॉल आला होता, त्यानंतर सारी जमवाजमव सुरू झाली.
अभिषेक पाटील, सविता पवार, मोहम्मद शेखसह चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली होती. यातील ४ नवीन लोकांना अटक केली आहे तर एकाचा शोध सुरू आहे.
नागपूर कॉलनंतर पत्रकार पाठवा, असा मेसेज आला होता. यानंतर पत्रकारांना फोनाफोनी झाली
मोहम्मद शेखने व्हॉट्सअॅप मेसेजचा त्यांनी हवाला दिला. यामध्ये शेखने सावधान शरद …शरद असे बॅनर तयार केले
या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे
आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे.
सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांचा युक्तिवाद
पवारांच्या घराचे कोणतही नुकसान झाले नाही, फक्त चप्पल फेक झाली, कोणलाही इजा झाली नाही.
नागपूरमधून फोन आल्याचा आरोप हवेतला आहे.
पैसे गोळा केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली नाही तर न्यायालयात त्याचा उल्लेख का?
हल्ला होणार हे पोलिसांना माहिती असून पोलीस तिथे हजर का नव्हते?
आंदोलकांनाच तिथे धक्काबुक्की झाली.
स्कॉटलँड यार्ड दर्जाचे पोलीस गाफील का राहिले? या आंदोलनात फक्त एसटी कर्मचारी होते.
या आंदोलनाला हल्ला म्हणता येणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा कुणालाही इजा पोहचवण्याचा उद्देश नव्हता.
कर्मचाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीत कर्मचारी बेशुद्ध झाले.
सदावर्ते घटनास्थळी नव्हते, 530 रुपयांचा उल्लेख करून तुम्हाला काय शोधायचे होते?
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीत फक्त 2 दिवसांची वाढ केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App