राज्यातील सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणसे रोज कमावतात आणि खातात. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर फक्त चारशे रुपये आहेत. आमच्यासारख्यांनी जगायचे कसे असा सवाल मुंबईतील एका तरुणाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विचारला आहे. government wake up, what should the daily earners do, video of a youth questioning the Thackeray government goes viral
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणसे रोज कमावतात आणि खातात. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर फक्त चारशे रुपये आहेत. आमच्यासारख्यांनी जगायचे कसे असा सवाल मुंबईतील एका तरुणाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विचारला आहे.
लोकलमध्ये नियमबाह्यपणे प्रवास केल्याबद्दल दंड झालेल्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकल प्रवासास बंदी असल्याने होत असलेल्या त्रासाबद्दल या तरुणाने रेल्वेच्या कार्यालयातून खंत व्यक्त केली असून, हाच व्हिडीओ ट्वीट करत मनसेनेही ठाकरे सरकारला सवाल केला आहे.
मुंबईत एका करणाºया एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय कर्मचाºयांन वगळता इतरांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र, असं असतानाही या तरुणाने लोकलमधून प्रवास केला. परळ स्थानकावर टीसीने त्याला पकडलं. त्यानंतर त्याने व्हिडीओ करून लोकल प्रवासाच्या बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली. तसंच सरकारचंही लक्ष वेधलं. या तरुणाचा व्हिडीओ मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि बहिरं सरकार ऐकेल का? असा सवाल केला आहे.
या तरुणाने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मी एक दीड वर्षांपासून घरी होतो. आता नोकरी मिळाली आहे. आज नोकरीचा दुसराच दिवस आहे. परळ स्थानकावर आल्यानंतर टीसीने मला पकडलं. यात टीसीची काहीच चुकी नाही. ते त्यांचं काम करताहेत. पण, सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणूस रोज कमावतात आणि खातात.
त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर चारशे रुपये आहेत. खूप मेहनतीनंतर नोकरी मिळाली आहे. तिकीट मिळत नाहीत, पासही मिळत नाहीत. पण सरकारी नोकरदार नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आमच्याकडे आज पैसे नाहीत आणि तरीही आमच्याकडून दंड वसूल केला जात असेल. सरकार अशी लुबाडणूक करत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी काय करायचं? लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. लोक फिरत आहेत मग का कोविड कोविड करत बसायचं?,
सरकारने पाच टप्प्यात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश काढल्यानंतर मुंबईतील लोकल सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात होती. मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात असतानाच काही दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकलबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. करोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App