शिवसेनेला खिंडार : महाराष्ट्रात तापलेय राजकारण; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण!!; राज्यपाल – एकनाथ शिंदे भेट लांबणीवर!!


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात आपले राजकारण राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांना कोरोनाची लागण!! गेल्या दोन दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय महानाट्यादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना  मुंबईतील गिरगावच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.Governer Bhagat Singh koshiyari infected with covid 19

राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सव्वा ९ वाजेच्या दरम्यान, त्यांनी गिरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र आता राज्यपाल यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे संभाव्य राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे विशेष विमानाने मुंबईत दाखल होणार आहेत. यावेळी ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असून माझ्यासोबत मोठा गट असल्याची माहिती ते राज्यपालांना देणार होते. मात्र आता राज्यपाल रूग्णालयात दाखल झाल्याने शिंदेंची भेट त्यांच्याशी कशी होणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Governer Bhagat Singh koshiyari infected with covid 19

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”