प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येत्या आर्थिक वर्षात याबाबत तरतूद केली जाणार आहे. Gift of Shinde-Fadnavis Government Chief Minister Kisan Yojana will be implemented in Maharashtra
मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतक-यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील शेतक-यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्यातदेखील मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतक-यांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
काय आहे योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतक-यांना सरकारकडून प्रत्येकी वर्षाला 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांची असते. वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांची रक्कम वर्ग केली जाते. वर्षातून तीनदा, दोन हजार रुपये या योजनेअंतर्गत शेतक-यांच्या खात्यावर पाठवले जातात. केंद्र सरकार हे पैसे थेट शेतक-यांच्या खात्यात वर्ग करते.
महाराष्ट्रात ही योजना लागू झाल्यानंतर केंद्र सरकारचे दरवर्षीचे 6000 रुपये आणि महाराष्ट्र सरकारचे 6000 रुपये असे वर्षभरात शेतकऱ्यांना आपल्या खात्यावर 12000 रुपये मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App