वृत्तसंस्था
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना गणपती पावला आहे. कारण एसटी महामंडळाला ५०० कोटी रुपये वितरित केल्याने तब्बल ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे. Ganpati blessed to ST employees; 500 crore distributed to the St corporation; The issue of salaries of 98,000 employees will be resolved
कोरोनाचे निर्बंध, घटलेली प्रवासी संख्या, इंधनाची दरवाढ आणि वेतन न मिळाल्यामुळे इत्यादी कारणांमुळे एसटी महामंडळाला वर्षभरापासून आर्थिक चिंता सतावत आहे. नुकतीच एसटीच्या एका चालकाने वेतन मिळाले नसल्याने आत्महत्या केली होती. यानंतर जागे झालेल्या ठाकरे – पवार सरकारने ५०० कोटींची मदत महामंडळाला वितरित केली आहे.
विविध करणांमुळे तारीख उलटूनही वेतन हाती आले नसल्याने घरखर्च भागवण्याची मोठी समस्या एसटी कर्मचाऱ्यांसमोर होती. त्यामुळे वेतनासाठी एसटी महामंडळाने ६०० कोटी रुपयांची मदत राज्य सरकारकडे मागितली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित केली आहे.
त्यामुळे राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App