वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात एका २५ वर्षीय महिलेवर घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.Gang Rape Case in Pune; Four persons arrested
दत्तवाडी पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका महिलेने फोन केला की, एका महिलेचा घरातून रडण्याचा आवाज येत आहे. तिला मदतीचा गरज आहे. तेव्हा आम्ही घटनास्थळी धाव घेतली. तिथे सात-आठ महिला घराजवळ उभ्या होत्या.
त्या घराजवळ गेल्यावर आम्ही आतमधील महिलेला आवाज दिला. तेव्हा रडण्याचा आवाज येत होता .पण, दरवाजा उघडला गेला नाही. अखेर आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा पीडित महिलेसह चार आरोपी आढळले. त्यानंतर तात्काळ पीडित महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. आरोपीना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App