प्रतिनिधी
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या एकमेकांच्या घरी गणेश दर्शनाच्या भेटीगाठी सुरू असताना केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज मुंबईत आधी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना खासगीरीत्या भेटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत निवासस्थान “वर्षा”वर जाऊन त्यांनी गणेश दर्शन घेतले. त्यामुळे अजित डोहाल यांच्यासारखे केंद्रातले एवढे महत्त्वाचे अधिकारी महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या मिशनवर आले आहेत??, याची चर्चा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. Ganesha Darshan to Chief Minister Eknath Shinde after Governor’s visit ajit dowal
अजित डोवाल यांच्यासारखे नेते सहसा एखाद्या राज्यात जाऊन राज्यपाल अथवा मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे फारसे घडत नाही. अजित डोवालांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा रोल थेट केंद्र सरकारशी संबंधित आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवात जेव्हा महाराष्ट्रातल्या विविध नेत्यांच्या एकमेकांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेणे आणि त्या निमित्ताने (न)राजकीय चर्चा करणे असा सिलसिला सुरू असताना अजित डोवाल यांनी आधी राज्यपालांची भेट घेणे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकारी निवासस्थान “वर्षा”वर जाऊन गणेश दर्शन घेणे याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज वर्षा या निवासस्थानी विराजमान झालेल्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे दर्शन घेतले. pic.twitter.com/dEDQBnRsB7 — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 3, 2022
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज वर्षा या निवासस्थानी विराजमान झालेल्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे दर्शन घेतले. pic.twitter.com/dEDQBnRsB7
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 3, 2022
Eknath Shinde Profile : एकेकाळी रिक्षाचालक होते एकनाथ शिंदे, जाणून घ्या, कसे चमकले राजकीय पटलावर? दिग्गज नेते कसे बनले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेत्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले आहे. अनेक नेते त्यांच्या घरी देखील दर्शनाला आले आहेत. यात प्रामुख्याने मनोहर जोशी, नारायण राणे, राज ठाकरे या नेत्यांचा समावेश आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी गणेशोत्सवाच्या काळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
या राजकीय पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांच्यासारखे अति वरिष्ठ आणि महत्त्वाचे अधिकारी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईत येऊन भेट घेतात याचा अर्थ लावण्याचे काम अनेक पातळ्यांवर सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित डोवाल यांचे वर्षा बंगल्यावर पुष्पगुच्छ देत आणि शाल घालून स्वागत केले आहे. अजित डोवाल यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात नेमके काय शिजणार आहे आणि नंतर कोणत्या राजकारणाला उकळी फुटणार आहे??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App