गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली, गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली. देशात गांधीवादी राजकारण्यांनी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. Gandhianism betrayed the country and Maharashtra, alleges Gunaratna Sadavarte


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली. देशात गांधीवादी राजकारण्यांनी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

सदावर्ते यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेची स्थापना केली आहे. याची अधिकृत घोषणा त्यांनी केली. सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देखील दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरु होते. या राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत.नव्या संघटनेची स्थापना करून सदावर्ते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभे करतील असे बोलले जात आहे.

सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. सदावर्ते यांनी 95 टक्के कर्मचारी हे एसटी कष्टकरी जनसंघाचे सभासद असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, ‘भीतीमुळे एसटी बँकेची निवडणूक घ्यायची हिंमत होत नाही. निवडणूक कधीही घेतली तरी विजय आमचाच होईल. काही कष्टकऱ्यांना कामावर घेण्यात आलेले नाही. तुरूंगात असलेल्या नवाब मलिकांची मंत्रिपदावरून हकालपट्टी का केली नाही? या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे. माझं सांगणे आहे की लवकरात लवकर अटक केलेल्या कर्मचाºयांना कामावर घ्यावे.

Gandhianism betrayed the country and Maharashtra, alleges Gunaratna Sadavarte

महत्वाच्या बातम्या