माजी सैनिक व कुटुंबासाठी मोफत प्राणायाम ध्यान शिबिर भारतीय लष्कराच्या त्यागास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ देणार अनोखी मानवंदना


विशेष प्रतिनिधी

पुणे : यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या महाराष्ट्र विभागातर्फे २४ ते ३० जानेवारी या कालावधीत ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून माजी सैनिक, त्यांचे कुटुंबियासह देशवासीयांना घरबसल्या सात दिवस विनामूल्य प्राणायाम ध्यान शिबिर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भारतीय जवानांनी देशासाठी गाजवलेले शौर्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाच्या कथा ‘शौर्यगाथा’ मधून सांगितल्या जाणार आहेत. Free Pranayama Meditation Camp for Ex-Servicemen and Family, A unique tribute to the Indian Army’s sacrifice of ‘Art of Living’

‘महाराष्ट्र मेडिटेट्स’मध्ये देशातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. यात कारगील युद्धातील शहीद कॅप्टन सौरभ कालिया याचे वडील एन. जे. कालिया,जम्मू काश्मीर येथील अतिरेकीविरोधी लढ्यातील शाहिद मेजर मयांक वैष्णोई यांच्या पत्नी स्वाती वैष्णोई,कारगिल युद्धात शाहिद होण्यापूर्वी भारतीय इतिहासातील सर्वात कठीण अशा पर्वतीय युद्धात नेतृत्व केलेले शाहिद कप्तान विक्रम बात्रा यांचे आई-वडील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून ‘शौर्यगाथा’ सांगणार आहेत.

ध्यान शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांचे मानसिक स्थिरता,  मनशांती लाभावी,  फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढावी यासाठी दि २४ ते ३० जानेवारी या काळात दररोज वेगवेगळ्या वेळी विनामूल्य, ऑनलाईन प्राणायाम ध्यान सत्रे  आयोजित केली आहेत. ही सर्वांसाठी खुली असून यात सहभागी होण्यासाठी https://aolmh.in/Maharashtra-Meditates या वेबसाईटवर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्टेट टीचर कोऑर्डिनेटर राहुल सदाशिव पाटील म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी अनेक सैनिक तरुण वयात कुटुंबीय व नातेवाईकांपासून दूर राहिले. त्यांच्या शौर्यास व त्यागास मानवंदना देण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने  विनामूल्य प्राणायाम ध्यान शिबीर आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच अन्य नागरिकांनी  ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या सत्रात सहभागी व्हावे.”

गेल्या वर्षी दोन लाख नागरिक सहभागी

कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात म्हणून २०२१ पासून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगकडून मोफत प्राणायाम ध्यान शिबीर घेतले जात आहेत. ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’च्या पहिल्या टप्प्यात जवळपास २ लाख नागरिक प्राणायाम ध्यान शिबिरात सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या अनेकांनी प्राणायाम सरावामुळे  फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. तसेच कोविडमुळे निर्माण झालेली भीती आणि चिंता कमी झाल्याचे सांगितले.  त्यांच्यापैकी बरेचजण आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशनच्या प्रशिक्षकांकडून शिकवली जाणारी ‘सुदर्शन क्रिया’ ही श्वसनप्रक्रियाही शिकले आहेत.

Free Pranayama Meditation Camp for Ex-Servicemen and Family, A unique tribute to the Indian Army’s sacrifice of ‘Art of Living’

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था