प्रतिनिधी
बारामती – महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत लिक्विड भरून ते इंजेक्शन म्हणून अव्वाच्या सव्वा दराला विकण्याचा संतापजनक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. Four youths Arrested For Allegedly Selling Fake Remdesivir Injections In Baramati
या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी चौघांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. करण्याचे चौघेजण या टोळीत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
एका रुग्णाला रेमडेसिवीरची गरज असल्याने नातेवाईकांनी या टोळीत कार्यरत असलेल्या एका सदस्याशी संपर्क साधला. कोविड हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱ्या या तरुणाकडे इंजेक्शन असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळं इंजेक्शनची विक्री करणाऱ्या तरुणाने रुग्णाच्या नातेवाईकाला फलटण चौकात बोलावून घेतले. आणि एका इंजेक्शनचे ३५ हजार तर, दोन इंजेक्शनचे ७० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते.
पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी वाहनांसह या टोळीतील काहींना ताब्यात घेतले. कोविड सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड भरून ती बाटली व्यवस्थित पॅक करत हे बनावट औषध तयार करून ते विकले जात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बनावट औषधांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तक्रार घेत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App