देशातील चाळीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात , दर तीन मिनिटाला एकाचा कोरोनाने मृत्यू


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : देशातील चाळीस टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब म्हणजे दर मिनिटाला एका नागरिकाचा कोरोनाने मृत्यू होत आहे.गेल्या 24 तासांत 68 हजार 631 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.Forty per cent of patients in the country die in Maharashtra, one every three minutes due to corona

संचारबंदी, वीकेंड लॉकडाऊन लागूनही रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय.महाराष्ट्रात दर तीन मिनिटाला एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात दर तासाला तीन हजार नागरिक कोरोनाबाधित होत असल्याची माहिती समोर आली आहे.संचारबंदी,विकेंड लॉकडाऊन लागूनही रूग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहेमुंबईत काल 8 हजार 479 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 53 जणांचा बळी गेला आहे.

मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.देशात कोरोना व्हायरस जलदगतीने पसरत आहे. मागील चार दिवसापासून २ लाखपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत.

महाराष्ट्रात साठ ते सत्तर हजार रुग्ण आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, या पाच राज्यात कोरोना संसर्ग असून कोरोना ग्रस्तांची टक्केवारी ५८ टक्के आहे.

Forty per cent of patients in the country die in Maharashtra, one every three minutes due to corona

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर