विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी महापौर व मुलुंडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचरित्र रामभजन सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. Former Mayor of Mumbai R. R. Singh dies
त्यांच्या निधनाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने धडाडीचा नेता गमावला असल्याचे महापौरांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. त्यांच्या निधनाबद्दल पार पडलेल्या महापालिका सभेत उप महापौर सुहास वाडकर यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक यांनी शोकप्रस्तावाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
१९७३ ते २००२ या कालावधीत ते नगरसेवक होते. १९९३ – ९४ मध्ये मुंबईच्या महापौरपदावर होते. स्थायी समितीवर (सन १९९१, १९९२ ) बेस्ट समितीवर ( सन १९७३, १९७८ ते १९८४, १९८५ ते १९८९ व १९९० ते १९९१,१९९१ ते १९९२) स्थापत्य समिती (उपनगरे) वर (सन १९७६ , १९७७ ) होते. आरोग्य समितीवर (सन १९७३ ते१९७५, १९७६ ते १९७८) अनुदान सहाय्य समितीवर ( सन १९८८,१९८९,१९९०,१९९२,१९९३, १९९७ व १९९८) मुंबई महानगर विकास प्राधिकरणावर (सन १९९५) , महापालिका महत्व वाढीचे प्रश्न व महापालिका आणि महापौरांचे अधिकार वाढविण्यासाठी गठीत समितीवर (सन १९९०) अश्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App