भगतसिंह कोश्यारींचा हेतू महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, तर समाजप्रबोधनाचा होता – मुंबई उच्च न्यायालय

कोश्यारी यांनी महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आणि विरोधी पक्षांच्या निशाण्यावर राहिले. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाकडून कोश्यारींना दिलासा देण्यात आला आहे. कारण, भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. Former Governor Bhagat Singh Koshyari had no intention of disrespecting the greats Commenting on the High Court the petition was dismissed

एवढंच नाहीतर कोश्यारी यांचा हेतू समाज प्रबोधन करण्याचाच होता, कोणत्याही महापुरूषाच्या अनादर करण्याचा नव्हता, असं निरीक्षण न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात नोंदवलं आहे आणि संबंधित याचिका फेटाळून लावली आहे.

‘’जीवनात हीच कामं आपल्याला आशीर्वादरूपी मदत करतात’’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केल्या भावना!

कोश्यारी यांनी महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप करत रामा कटारनावरे यांनी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी फौजदारी कारवाईची मागणी करत रिट याचिका दाखल केली गेली होती. अनुसूचित जातीसोबतच सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

राज्यपालांची वक्तव्य ही इतिहासाच्या विश्लेषणात्मक आणि राज्यपालांचा सामाजिक दृष्टीकोन दाखवतात. श्रोत्यांनीही समाजाभीमूख दृष्टीकोन आत्मसात करत तो आचरणातही आणावा हाच त्या वक्तव्यांमागचा उद्देश होता. त्यामुळे ही वक्तव्य प्रथमदर्शनी कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणारी नाहीत. म्हणूनच ही फौजदारी कायद्यानुसार, दखल घेण्यास पात्र ठरत नाहीत. असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Former Governor Bhagat Singh Koshyari had no intention of disrespecting the greats Commenting on the High Court the petition was dismissed

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात