राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मंत्री नवाब मलिक एनसीबीचे विभागिय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. त्यांच्या जातीवरूनही सवाल करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली आणि दलित असलेल्या वानखेडे कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी केली.For the help of Sameer Wankhede, Kirit Somaiya now meets the Chairman of the Scheduled Castes Commission
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मंत्री नवाब मलिक एनसीबीचे विभागिय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. त्यांच्या जातीवरूनही सवाल करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली आणि दलित असलेल्या वानखेडे कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी केली.
मलिक यांनी दररोज नवनवे विषय काढून वानखेडे कुटुंबीयांवर टीका करत आहेत. सुरुवातीला भाजपही वानखेडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती. परंतु धमार्चा वाद पुढे आल्यानंतर वानखेडे एकाकी पडताना दिसले. मलिक-वानखेडेंच्या आरोप-प्रत्यारोपात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आल्याने आता मलिक विरुद्ध फडणवीस असे युद्ध सुरू झाले आहे. सोमय्या यांनी मंगळवारी दिल्लीत विजय सांपला यांची भेट घेतली.
समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या तक्रारीकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. या दलित कुटुंबाला आयोगाने न्याय द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. वानखेडे यांच्या कुटुंबीयांच्या छळवणुकीच्या तक्रारीसंबंधी आयोगाने महाराष्ट्र सरकार व पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागितले आहेत.
पंरतु, अद्याप अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आलेला नाही. आयोगाकडून लवकरच राज्य सरकारला स्मरणपत्र पाठविले जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकार मुद्दाम अहवाल देत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App