हसन मुश्रीफांवरील ईडीची कारवाई आणि पिक पंचनाम्यांबाबतही दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हटलं आहे.
प्रतिनिधी
पुणे : राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना निवडणूक निकालासह हसन मुश्रीफांवरील इडीची कारवाई, पिक पंचनाम्यांबाबत प्रश्न विचारले ज्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. For the first time in Pune after the Kasba elections Fadnavis told the media about the result
कसबा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीसांनी सांगितले की, ‘’एखादी निवडणूक जिंकतो किंवा हरतो याने फार काही फरक पडतो असं मला वाटत नाही. मात्र कुठल्याही निवडणुकीच्या विजयानंतर किंवा पराजयानंतर आम्ही त्याचं मूल्यमापन किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर पोस्टमार्टम करत असतो ते आम्ही केलं आहे, त्यानुसार जी योग्य काळजी घ्यायची ती आम्ही घेऊ.’’
हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर त्यांना तपास यंत्रणांची भीती का वाटतेय?- भाजपा
हसन मुश्रीफांवर सकाळपासून ईडीची कारवाई सुरू आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले, ‘’ मला याची काही माहिती नाही. माध्यमातूनच ही माहिती पाहायला मिळत आहे. असे सांगत त्यावर त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.’’
याचबरोबर नाशिक, सांगली भागातील पिकांचे पंचनामे झाले नाहीत, असं सांगितलं जात आहे. यावर फडणवीसांनी सांगितल की, ‘’दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. तत्काळ पंचनाम्यांचे आदेश आपण दिले. आता त्याची सुरुवात झाली आहे, थोडाकाळ त्यासाठी लागणारच आहे. पण आम्ही त्या व्यतिरिक्त हे सांगतोय की शेतकऱ्यांनी नुसता तिथला फोटो जरी काढला, तरी आपण त्याला पंचनामा मानतो.’’
LIVE | Media interaction in #Pune https://t.co/uj9wnN6Sft — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 11, 2023
LIVE | Media interaction in #Pune https://t.co/uj9wnN6Sft
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 11, 2023
याशिवाय ‘’मला तर विरोधी पक्षाचंही आश्चर्यच वाटतं की त्यांच्या काळातील पैसेही आम्ही देतो आहोत आणि आता रात्री पाऊस पडला नाही की सकाळी ते पंचनामा झाला नाही म्हणून गोंधळ घालतात. एवढ्या वेगाने पंचनामा रात्री पडलेल्या पावसाचा सकाळी कधी त्यांनीतरी पाहिला आहे का? त्यामुळे मला असं वाटतं, अतिवृष्टी वैगरे अशा ज्या घटना आहेत त्याबद्दल आपण संवेदनशील असलो पाहिजे, याचं राजकारण करणं योग्य नाही.’’ असंही फडणवीसांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App